मुंबई : यंदा 17 दिवस उधाण भरतीचे | पुढारी

मुंबई : यंदा 17 दिवस उधाण भरतीचे

मुंबई/ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : एकाच वेळी समुद्राला येणारी भरती आणि महापूर अशी स्थिती निर्माण झाल्यास मुंबई आणि ठाण्यासारखी शहरे अनेक ठिकाणी पाण्याखाली जातात. अशी स्थिती जूनमध्ये 6 वेळा निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच जूनमध्ये सर्वाधिक पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यातील साडेचार मीटरपेक्षा जास्त उंच भरतीचे 17 दिवस आहेत, अशी माहिती खगोल अभ्यासक , पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. दिलेली उंची ही समुद्रातील लाटांची उंची नसून ती भरतीच्या पाण्याची आहे, असे सोमण यांनी स्पष्ट केले.

यंदा मान्सून वेळेत येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. समुद्राला उधाण भरती आली आणि त्याचवेळी जर कमी वेळात जास्त पाऊस पडला तर मुंबई-ठाणेकरांना पावसाच्या तुंबलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते. यावर्षीही अशीच स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

यावेळी सरासरी 100 टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. कोकणात दरवर्षी सुमारे साडेतीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो. डोंगर भागात ही सरासरी सर्वाधिक असते. मौसमी पाऊस अंदमान निकोबारच्या दिशेने आगेकूच करत असून मान्सून पूर्व पाऊस मे च्या अखेरीस पडण्याची शक्यता आहे. पेरण्या जूनच्या पहिल्या आठवड्यातच होतील.

जुलैमध्ये भरतीची स्थिती 6 वेळेस असणार आहे. ऑगस्टमध्ये 5 दिवस भरतीचा वेग असेल. 5 मीटर पाण्याची उंची असेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई आणि पालघर या 5 जिल्ह्यात 17 दिवस उधाण भरतीचे आहेत. कोकण किनार पट्टीवरील काही भाग समुद्रात जाण्याची भीती संशोधकांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. सिंधुदुर्गातील देवबाग हा भाग समुद्राने गिळंकृत केला आहे. तसेच अन्य 5-6 किनार्‍यावरही ही स्थिती गेल्या 5 वर्षापासून उद्भवते आहे.

वेळा आणि भरतीची उंची

तारीख                   भरतीची वेळ        भरतीची उंची
सोमवार, 13 जून      सकाळी 11-08     4.56 मीटर.
मंगळवार, 14 जून    सकाळी 11-56     4.77 मीटर.
बुधवार, 15 जून       दुपारी 12-46        4.86 मीटर.
गुरुवार, 16 जून       दुपारी 1-35          4.87 मीटर.
शुक्रवार, 17 जून      दुपारी 2-25          4.80 मीटर.
शनिवार, 18 जून      दुपारी 3-16          4.66 मीटर.
बुधवार, 13 जुलै       सकाळी 11-44     4.68 मीटर.
गुरुवार, 14 जुलै       दुपारी 12-33       4.82 मीटर.
शुक्रवार, 15 जुलै      दुपारी 1-22        4.87 मीटर.
शनिवार, 16 जुलै      दुपारी 2-08        4.85 मीटर.
रविवार, 17 जुलै       दुपारी 2-54         4.73 मीटर.
सोमवार, 18 जुलै     दुपारी 3-38         4.51 मीटर.
गुरुवार, 11 ऑगस्ट  सकाळी 11-33    4.59 मीटर.
शुक्रवार, 12ऑगस्ट  दुपारी 12-18      4.77 मीटर.
शनिवार , 13 ऑगस्ट  दुपारी 1-00     4.85 मीटर.
रविवार, 14 ऑगस्ट   दुपारी 1-39      4.81 मीटर.
सोमवार, 15 ऑगस्ट  दुपारी 2-18     4.66 मीटर.

Back to top button