मुंबई : स्पामध्ये चालणार्‍या दोन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश | पुढारी

मुंबई : स्पामध्ये चालणार्‍या दोन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : स्पासह फार्मसी आयुवैदिक औषधी केंद्रात मसाजच्या नावाने चालणार्‍या दोन सेक्स रॅकेटचा भोईवाडा आणि गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी विभागाच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी स्पा आणि औषधी केंद्राच्या एका महिला मॅनेजरसह दोघांना अटक केली. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी चार महिलांची सुटका केली आहे. मेडीकल केल्यानंतर या चारही महिलांची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

दादर येथील शारदा सिनेमागृहाजवळील नायगाव क्रॉस रोड, म्युनिसिपल लेबर कॅम्प परिसरात शारदा फार्मसी आयुवैदिक औषधी भंडार नावाचे एक केंद्र आहे. या केंद्रात मोहम्मद वसीम अक्रम अन्सारी हा मॅनेजर म्हणून कामाला आहे. आयुवैदिक औषधी केंद्रात येणार्‍या ग्राहकांना मसाजच्या नावाने तिथे काम करणार्‍या महिलेसोबत वेश्याव्यवसायात प्रवृत्त केले जात असल्याची माहिती भोईवाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने बोगस ग्राहक पाठवून त्याची शहानिशा केली होती. त्यात तथ्य असल्याचे आढळून येताच या पथकाने शुकक्रवारी दुपारी या आयुवैदिक केंद्रात छापा टाकून तिथे चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता.

या कारवाईत पोलिसांनी मॅनेजर मोहम्मद वसीमला अटक केली तर एका महिलेची सुटका केली. या गुन्ह्यांत अनिल कांबळे याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत. अनिल आणि मोहम्मद वसीम बळीत महिलेच्या मदतीने मसाजच्या नावाने तिथे सेक्स रॅकेट चालवित असल्याचे उघडकीस आले आहे.

दुसर्‍या घटनेत गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अंमलबजावणी विभागाने तीन दिवसांपूर्वी वरळीतील अब्दुल गफार खान रोड, सी फेस परिसरातील न्यू सागर विहार सहकारी सोसायटीमध्ये अरुझा स्पामध्ये कारवाई केली होती.

या कारवाईत पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली. या महिलेच्या मदतीने तिथे सेक्स रॅकेट चालत होते. यावेळी स्पाच्या महिलेला मॅनेजरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत स्पाच्या मालकीणीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.

Back to top button