‘सुरक्षित शाळा प्रवेश अभियान राज्यभर पोहोचावे’ : आदित्य ठाकरे | पुढारी

‘सुरक्षित शाळा प्रवेश अभियान राज्यभर पोहोचावे’ : आदित्य ठाकरे

मुंबई  ; पुढारी वृत्‍तसेवा : मुंबई महापालिकेचे ‘सुरक्षित शाळाप्रवेश’ अभियान शालेय शिक्षण विभाग आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून राज्यात सर्वदूर पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षा मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ उपक्रमाचा शुभारंभ बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात पर्यावरण व पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरेयांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, माजी महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते.

या उपक्रमाचे उद्घाटन करताना आदित्य ठाकरे म्हणाले, प्रत्येक महापालिका शाळेच्या 500 मीटर परिघात विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वावरता आले पाहिजे. त्यासाठी चांगले पदपथ, पथदिवे, रस्ते, बस थांबे, रस्ता ओलांडण्याची सुविधा आवश्यक आहे.

Back to top button