नवनीत राणा यांचे मुख्यमंत्र्यांना नवे चँलेज!, डिस्चार्ज मिळताच म्हणाल्या… | पुढारी

नवनीत राणा यांचे मुख्यमंत्र्यांना नवे चँलेज!, डिस्चार्ज मिळताच म्हणाल्या...

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान देत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

नवनीत राणा यांनी पुढे बोलताना, मी कोणता गुन्हा केला ज्याची मला शिक्षा देण्यात आली? असा सवाल उपस्थित केला. जर हनुमान चालिसाचे पठण करणे हा गुन्हा असेल तर मी १४ वर्षे शिक्षा भोगायला तयार आहे, अशीही भावना त्यांनी बोलून दाखवली. अन्यायाविरुद्धचा माझा लढा चालूच राहणार आहे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

खासदार राणा पुढे म्हणाल्या की, मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत मी शिवसेनेविरुद्ध प्रचार करणार आहे. मुंबईच्या जनतेला न्याय देण्यासाठी मी पालिका निवडणुकीच्या प्रचारात सर्व ताकदीनिशी उतरणारीन. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दम असेल लोकांमधून निवडून दाखवावे. त्यांनी कोणताही मतदार संघ निवडावा, त्या ठिकाणी मी त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवीन, असेही खा. राणा म्हणाल्या.

संबंधित बातम्या

नवनीत राणा यांनी आज पुन्हा एकदा शिवसेनेने नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी राऊतांचा पोपट असा उल्लेख करत पालिका निवडणुकीत त्यांना जनताच जमनीत गाढून टाकेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

Back to top button