पुढारी ऑनलाईन डेस्क : भोंग्यामुळे लोकांना त्रास नको हीच शिवसेनेची भुमिका आहे, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलत असताना व्यक्त केले. मशिदींवरील भोंगे हटविण्याबाबत शिवसेनेची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. ते पुढे असंही म्हणाले की, भोंगा हा महत्वाचा विषय नाही. देशात इतरही अनेक विषय आहेत. राज्यातील राजकारणामध्ये भोंग्यावरून आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत आहेत.
सध्या महागाईचा मुद्दा मोठा आहे. जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या. बाबरीबाबत किती काळ बोलणार? असा सवालदेखील त्यांनी यावेळी विरोधी पक्षांना केला. देशातल्या इतर महत्त्वांच्या प्रश्नांवरून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असा आरोप भाजपवर त्यांनी केला.
बाबरीच्यावेळी शिवसेना नेते कुठे होते हे तुमच्याच नेत्यांना विचारा? असा प्रतिसवाल संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला. देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईतील सभेमध्ये शिसेनेवर केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देत असताना भाजपवर त्यांनी टीका केल्या. काल एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीका केली. या मुलाखतीविषयी विचारले असता राऊत यांनी त्यांनी उत्तर देणे टाळले.
हेही वाचा