Sanjay Raut : ईडीच्या चौकशीतून राणा दाम्पत्य कसे काय सुटले : संजय राऊत | पुढारी

Sanjay Raut : ईडीच्या चौकशीतून राणा दाम्पत्य कसे काय सुटले : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क: ईडीच्या चौकशीतून राणा दाम्पत्य कसे काय सुटले? लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना यासंबंधी पत्र लिहिणार आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

राणा दाम्पत्यांनी लकडावालांकडून घेतलेल्या पैशांच्या आरोपाबाबत बोलत असताना संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. 20-25 लाखांसाठी आमच्यावर कारवाई होते, मग त्यांच्यावर का नाही? असा सवाल करत त्यांनी राणा दाम्पत्यांवर ईडीच्या कारवाईची मागणी केली. त्यांच्या मागे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे असा आरोपदेखील त्यांनी केला.

डी गँगचा संदर्भ देत त्यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणे खूप होत आहेत असे ते म्हणाले. मला असं दिसतंय की 15 दिवसांमध्ये घडणाऱ्या घटनांमध्ये डी गँगचा समावेश आहे. महाराष्ट्रातील वातावरण बिघडविण्याचे काम डी गँगचे चालू आहे. राणांनी त्या पैशाचा वापर कुठे केला याचा तपास करण्यात यावा. राणा दाम्पत्य अचानक राम-हनुमानांचे का भक्त झाले असा सवाल त्यांनी यावेळी केला. पोलीस, अनेक ईडीचे अधिकारी भाजपात प्रवेश करत आहेत. देवेंद्र फडणवीस यावर अद्याप का गप्प आहेत, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला.

रात अभी बाकी है..बात अभी बाकी हैं….

रात अभी बाकी है… बात अभी बाकी हैं….जय महाराष्ट्र!!! असं मत व्यक्त करत संजय राऊत यांनी ट्विटर माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग संबंधीत प्रकरणाचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ते म्हणतात की, तुरुंगात मरण पावलेल्या युसूफ लकडावाला यांच्याकडून नवनीत राणा यांनी 80 लाखांचे कर्ज घेतले होते. त्यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि डी गँगशीही त्याचे संबंध होते. माझा प्रश्न हा आहे की ईडीने याची चौकशी केली का? हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे!. अशी माहिती एका ट्विटमधून संजय राऊत यांनी दिली. या ट्विटमध्ये त्यांनी या घोट्याळ्याशी संबंधीत फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा

Back to top button