पीएसआय पूर्वपरीक्षेत एमपीएससीच नापास

पीएसआय पूर्वपरीक्षेत एमपीएससीच नापास
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : पीएसआय पूर्वपरीक्षेच्या दिलेल्या उत्तरसूचीत प्रश्नांची उत्तरे चुकीची देण्यात आल्याची तक्रारी उमेदवारांनी केली आहे. 16 एप्रिलला झालेल्या या परीक्षेची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) उत्तरसूची शनिवारी जाहीर केली. परीक्षेत विचारण्यात आलेल्या 100 प्रश्नांपैकी 11 प्रश्नांच्या उत्तराबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम आहे.

गेल्या चार वर्षांत एमपीएससीने विभागीय पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचे आयोजन केले नव्हते. 16 एप्रिल रोजी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्वपरीक्षा 2021 घेण्यात आली. एकूण 100 गुणांच्या बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नाला 1 गुण होता. मराठी, इंग्रजी, जनरल स्टडी (जीएस) या विषयांवर आधारित प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र प्रश्नपत्रिकेत मराठीतील 4, इंग्रजी 2 आणि जीएसमधील 5 प्रश्नांची चुकीची उत्तरे एमपीएससीने जारी केलेल्या उत्तरसूचीत देण्यात आली आहेत.

प्रश्नपत्रिकेत बरोबर उत्तराचा पर्याय दिला असतानाही एमपीएससीच्या उत्तरसूचीत चुकीचे उत्तर दाखविण्यात आले आहे. अशाप्रकारे संपूर्ण प्रश्नपत्रिकेत 11 प्रश्नांमध्ये बरोबर उत्तराऐवजी चुकीचे उत्तर उत्तरसूचीत देण्यात आले आहे. उत्तरसूची जाहीर झाल्यानंतर आठवडाभरात उमेदवारांनी चुकीच्या उत्तरांबाबत हरकती आणि संदर्भ पुरावे एमपीएससीकडे सादर करणे अपेक्षित आहे. एमपीएससी काय निर्णय घेते याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

असे आहेत संभ्रम निर्माण करणारे प्रश्न

1. पहिला प्रश्न दुसर्‍याचा मनातले जाणणारा, यासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा असा होता. अंतर्ज्ञानी, अंतर्धान, मनकवडा, भविष्यवेत्ता हे पर्याय होते. या प्रश्नांचे योग्य उत्तर अंतर्ज्ञानी आणि मनकवडा असे आहे. मात्र उत्तरसूचीत फक्त एक बरोबर बाकी सर्व चूक हे उत्तर देण्यात आले आहे.

2. इंग्रजीच्या प्रश्नात The Sun has ripened the fruit. Which one of the following is the Passive Structure corresponding to the active Voice structure above? हा प्रश्न विचारण्यात आला होता. The fruit has been ripened by the Sun. हे बरोबर उत्तर आहे. मात्र उत्तरसूचीत The fruit is ripened by the Sun. हे उत्तर बरोबर असल्याचे म्हटले आहे.

3. 70 वा प्रश्न माझ्या आठवणी हे पुस्तक कोणी लिहिले, असा होता. या प्रश्नाच्या उत्तरासाठी अण्णाभाऊ साठे, विठ्ठल रामजी शिंदे, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे हे पर्याय दिले होते. एमपीएससीच्या उत्तरसूचीत पर्याय 2 विठ्ठल रामजी शिंदे हे उत्तर आहे. मात्र माझ्या आठवणी हे पुस्तक हिमानी सावरकर यांचे आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव माझ्या आठवणी व अनुभव असे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news