राणा दांपत्याला काही झाले तर त्याला ठाकरे जबाबदार : नारायण राणे | पुढारी

राणा दांपत्याला काही झाले तर त्याला ठाकरे जबाबदार : नारायण राणे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणू अशी घोषणा राणा दांपत्यांनी केली होती. यानंतर राणा दांपत्यांनी हे आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. पण, राणा यांच्या खार येथील घरासमोर गर्दी केलेल्या शिवसैनिकांनी राणा यांनी माफी मागितल्या शिवाय घराबाहेर पडू न देण्याचा पावित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसैनिक व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. तसेच पोलिसांनी राणा दांपत्यांना सुखरुप व सुरक्षित घराबाहेर पडू द्यावे, अन्यथा मी स्वत: राणा यांच्या घरी जाऊन त्यांना तेथून बाहेर काढू, असा इशारा देखिल दिला. तसेच राणा दांपत्याला काही झाले तर त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार असतील असे म्हणाले.

या वेळी टिका करताना नारायण राणे म्हणाले, कुठली शिवसेना आणि शिवसेना कशासाठी घाबरते. सत्ता शिवसेनेची असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर हनुमान चालीसा म्हणू म्हणणाऱ्या राणा दांपत्यांना का घाबरत आहे( असा देखिल टोला यावेळी नारायण राणे यांनी लगावला. तसेच मातोश्री समोर २३५ शिवसैनिक आणि राणा यांच्या घराबाहेर १२५ इतकेच शिवसैनिक आहेत. बाकी कोणी नाही असे नारायण राणे म्हणाले.

यावेळी नारायण राणे यांनी पोलिसांना जाब विचारत म्हणाले की, आमदार रवी राणा आणि खासदार नवणीत राणा यांनी कोणता गुन्हा केला आहे. शिवाय ते आंदोलन थांबवून बाहेर पडू म्हणतात तर त्यांना सुरक्षित बाहेर पडू दिले पाहिजे. पोलिसांनी राणा कुटुंबियांना सुरक्षित बाहेर नाही काढले तर मी स्वत: त्यांच्या घरी जाऊन बाहेर काढू कोण काय करते ते पाहू असे आव्हान राणे यांनी यावेळी दिले. तसेच राणा यांना लागेल ती मदत करु असे ही राणे म्हणाले.

Back to top button