मध्य रेल्वेकडून मुंबई ते महू दरम्यान २० अतिजलद गाड्या | पुढारी

मध्य रेल्वेकडून मुंबई ते महू दरम्यान २० अतिजलद गाड्या

मुंबई; पुढारी ऑनलाईन : उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि महू दरम्यान विशेष शुल्कासह २० अतिजलद साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय मध्ये रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

०१५०१ अतिजलद साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. २८ एप्रिल २०२२ ते ३० जून २०२२ (१० फेऱ्या) दर गुरुवारी ०५.१५ वाजता सुटेल आणि महू येथे दुसऱ्या दिवशी १२.४५ वाजता पोहोचेल.

०१०५२ अतिजलद साप्ताहिक विशेष महू येथून दि. ३० एप्रिल २०२२ ते २ जुलै २०२२ (१० फेऱ्या) दर शनिवारी ०५.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता पोहोचेल असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

हा रेल्वे मार्ग कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती स्टेशन, बिना, वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन, ओराई, कानपूर, फतेहपूर, प्रयागराज, ग्यानपूर, बनारस आणि वाराणसी या ठिकाणावरून असणार आहे. दरम्यान, या स्थानकामध्ये रेल्वे थांबणार ही आहेत.

एक प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान आणि गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ७ सामान्य द्वितीय श्रेणी या स्तरात ही वाहने धावणार आहेत.

विशेष शुल्कासह विशेष ट्रेन क्रमांक ०१५०१चे बुकिंग दि. २४ एप्रिल २०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

Back to top button