मुंबईत रेल्‍वेचा अपघात; दादर पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे ३ डबे रूळावरून घसरले | पुढारी

मुंबईत रेल्‍वेचा अपघात; दादर पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे ३ डबे रूळावरून घसरले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सिग्नल चुकीचा दिला गेला आणि एकाचा रुळावर आलेल्या दादर पुद्दुचेरी एक्सप्रेस व गदग एक्सप्रेसचे डबे एकमेकांना घासले या धक्क्याने पुद्दुचेरी एक्सप्रेसचे तीन डबे घसरुन झालेल्या अपघातात शुक्रवारी (दि.१५) रात्री लांब पल्ल्याची रेल्वे वाहतुक ठप्प झाली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

रात्री दहाच्या सुमारास दादर माटुंगा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान हा अपघात घडला. पुद्दुचेरी एक्सप्रेसने दादर स्थानक सोडले आणि गदग एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन निघाली. ज्या रुळावरुन पुद्दुचेरी एक्सप्रेस निघाली त्याच रुळावर गदग एक्सप्रेस देखिल धावू लागली. रुळ न बदलल्याने दोन्ही एक्सप्रेसचे डबे एकमेकांना धडकले. दोन्ही गाड्यांचा वेग अत्यंत कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, पुद्दुचेरी एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरुन घसरल्याने मुंबईची लोकल सेवा विस्कळीत झाली आणि लांब पल्ल्यागाड्याही ठप्प झाल्या.

दादर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. ३,४ आणि ६ येथून जाणाऱ्या लोकल गाड्या तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतुक लगेच थांबविण्यात आली. मध्यरेल्वेच्या अनेक स्थानकावर प्रवास्यांची गर्दी गाड्यांची वाट पहात रात्री उशिरापर्यंत खोळबंली आहे.

Back to top button