‘३ मे पर्यंत सगळ्या मौलवींना बोलावून भोंगे उतरवण्यास सांगा, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालीसा’

‘३ मे पर्यंत सगळ्या मौलवींना बोलावून भोंगे उतरवण्यास सांगा, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालीसा’
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : ठाण्यातील उत्तर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणावर प्रहार करणार याची रंगली होती. राज ठाकरे लाव रे तो व्हिडिओ पार्ट २ करणार का याचीही उत्सुकता होती. गुडीपाडव्याच्या सभेत मशिदीवरून भोंगे उतरले नाही, तर दुपटीच्या आवाजाने भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता.

त्यांच्या या विधानानंतर राज ठाकरेंवर सडकून टीका झाली होती. त्या टीकेवरून आता राज ठाकरे यांनी आपल्याच जुन्या भाषणातील तीन व्हिडिओ सादर करत भोग्यांना यापूर्वीही विरोध केल्याचे दाखवून दिले. त्यांनी अजित पवारांवर टीका करताना मी कधी काय बोललो हे मला चांगलं लक्षात असतं असा टोला लगावला.

राज ठाकरे म्हणाले की, राज्य सरकार आणि गृह खात्याला सांगणं आहे आम्हाला महाराष्ट्राचे स्वास्थ बिघडावयचे नाही, पण त्याआधी 3 मे पर्यंत सगळ्या मौलवींना बोलावून भोंगे उतरवण्यासाठी सांगा. मतांसाठी वाटेल ते चालवून घेणार नाही. मतांसाठी वाटेल ते चालवून घेणार नाही. तसे झाली नाही, तर देशभर हनुमान चालीसा लावा. आम्ही वातावरण बिघडवत नसून हा धार्मिक नव्हे तर सामाजिक विषय आहे.

राज ठाकरे म्हणाले..

  • अजित पवार मी कधी काय बोललो हे मला चांगलं लक्षात असतं
  • याआधी देखील मी भोंग्यावरून बोललो आहे ते अजित पवारांना ऐकू आलं नाही
  • अजान घरात द्या, शहरातील रस्ते का अडवता, प्रार्थना तुमची आहे आम्हाला का ऐकवता
  • नीट समजावून समजत नसेल तर हनुमान चालीसा लावणारच
  • सगळे बेसूर असतात का म्हणून ऐकायचं
  • राज्य सरकारला सांगणं आहे आम्ही मागे हटणार नाही
  • या गोष्टीचं सोक्ष मोक्ष लागलाच पाहिजे, सणवार असेल तर समजू शकतो
  • पण ३६५ दिवस का ऐकवतं,
  • राज्य सरकार आणि गृह खात्याला सांगणं आहे महाराष्ट्राचे स्वास्थ बिघडावयचे नाही
  • पण त्याआधी 3 तारखेपर्यंत सगळ्या मौलवींना बोलावून भोंगे उतरवण्यासाठी सांगा
  • मतांसाठी वाटेल ते चालवून घेणार नाही
  • देशावर प्रेम करणारे मुसलमान लोक भरडले जातात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news