वेळ आली तर शिवसेना भवन फोडू : भाजप आमदार प्रसाद लाड - पुढारी

वेळ आली तर शिवसेना भवन फोडू : भाजप आमदार प्रसाद लाड

मुंबई; पुढारी ऑनलाईन : भाजप नेते प्रसाद लाड यांनी एका कार्यक्रमात शिवसेनेवर निशाणा साधला. त्यांनी या कार्यक्रमावेळी वेळ आल्यास सेनाभवन फोडू असं वक्तव्य केलं आहे.

प्रसाद लाड म्हणाले की, दक्षिण मध्य मुंबईत कोणताही मोर्चा असेल तिथे आम्ही येणार आहोत. मोर्चाला आम्ही आल्यावर तिथे कुणी थांबणार नाही. सेनेच्या कुंडल्या आमच्याजवळ आहेत. शिवसेनेला वाटतं की आम्ही माहीममध्ये आल्यावर सेनाभवन फोडू. तर त्यांना सांगतो की वेळ आली तर आम्ही सेनाभवन पण फोडू, असं धक्कादायक त्यांनी यावेळी केलं.

ते पुढे म्हणाले की, किल्ला फक्त छत्रपतींचा बाकी यांचे (शिवसेनेचे) बालेकिल्ले आम्ही पाडून टाकू. पुढच्या वेळी आम्ही कार्यकर्ते घेऊन येणार नाही पोलीस इतके असतात की आम्हाला गरज नाही त्यांना सिव्हिल मध्ये बसवू. त्यांना वाटत की आम्ही माहीममध्ये आल्यावर सेनाभवन फोडू तर त्यांना सांगतो की वेळ आली तर आम्ही सेनाभवन पण फोडू असं वक्तव्य केलं आहे.

अधिक वाचा :

दरम्यान, शिवसेना नेते सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया देत प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

अहिर म्हणाले की, कुणी किती बोलावे आणि काय बोलावं हे लक्षात घ्यायला पाहिजे. कोण प्रसाद लाड त्यांना माहीत नाही का शिवसेना भवनवर आधी कुणाला किती प्रसाद मिळाला आहे. कुणीही प्रसिद्धीसाठी वाटेल ते वक्तव्य करू नये, असा इशारा दिला आहे.

शिवसेना भवनच्या फुटपाथवर येऊन दाखवा ते आमचं मंदिर आहे. यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ. बाळासाहेबांचा शिवसैनिक आजही सेनाभवनला आपल्या हृदयात ठेवतो.

माहीम, दक्षिण मुंबई परिसरात शिवसेना काय आहे हे विरोधकांना माहिती आहे. अशी १०० कार्यालय उभी केली तरी शिवसेनेला फरक पडणार नाही. शक्तिप्रदर्शन करून काही फायदा होणार नाही, असं घणाघाती प्रत्युत्तर दिलं सचिन अहिर यांनी लाड यांना दिलं आहे.

दरम्यान, शिवसेनेची शाखा म्हणजे आमच्यासाठी मंदिर आहे. या मंदिराच्या माध्यमातून आम्ही समाजसेवा करतो. शिवसैनिक कट्टर आहेत. भाजपचे नेते या आधीही सेनाभवनावर भुंकले होते. त्यांना चोख उत्तर शिवसैनिकांनी दिलं आहे.

आम्हा शिवसैनिकांचं कुणी वाकडं करु शकत नाही. सेनेवर आरोप करणारी व्यक्ती वैचारिक दिवाळखोरी असलेली आहे, अशी टीका शिवसेना नेते सदा सरवणकर यांनी केली आहे.

अधिक वाचा :

Back to top button