पुढारी ऑनलाईन डेस्क : डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना न्यायालयाने १५ दिवसांच्या कारावासाची आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
किरीट सोमय्या यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, संजय राऊत यांना १५ दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही रक्कम तक्रारदार प्रोफेसर डॉ. मेधा सोमय्या यांना दिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.