मुलीची बदनामी थांबवा अन्यथा आत्महत्या करू, दिशा सालियानच्या पालकांची राष्ट्रपतींकडे याचना | पुढारी

मुलीची बदनामी थांबवा अन्यथा आत्महत्या करू, दिशा सालियानच्या पालकांची राष्ट्रपतींकडे याचना

 पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहची माजी मॅनेजर दिशा सालियान हिचा ८ जून २०२० रोजी मुंबईतील बहुमजली इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. पोलिसांच्या तपासात ही आत्महत्या असल्याचे म्हटले असून दिशाच्या कुटुंबीयांनीही आत्महत्या असल्याचे मान्य केले आहे.

दिशा सालियानच्या पालकांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्‍यासह पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र विरोधीपक्ष नेते, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना ट्विटरवर पाच पानांचे पत्र लिहिले आहे. या पत्रात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोघेही दिशाची बदनाम करत तिच्‍या मृत्यूवरून राजकारण करत आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

याशिवाय या पत्रात दिशाच्या पालकांनी राष्ट्रपतींना विनंती करत “एकतर अधिकार्‍यांना योग्य कारवाई करण्याचे निर्देश द्यावे अन्यथा आम्ही आत्महत्या करू, आमच्या मुलीचं नाव काही राजकारण्यांनी बदनाम करणं थांबवावं”.

यापूर्वी दिशाच्या आईनेही नारायण राणे आणि त्यांचा मुलगा नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. हे दोघेही आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत खोट्या गोष्टी पसरवत तिची प्रतिमा मलिन करत असल्याचा त्यात म्हटले होते.

दिशाने काही दिवसच सुशांत सिंह राजपूतच्या मॅनेजर पदाचे काम पाहिले होते. सुशांतसोबत दिशाने भारती सिंग, रिया चक्रवर्ती आणि वरुण शर्मा यांसारख्या सेलिब्रिटींसोबत काम केले आहे. दिशाच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी आपल्या तपासात स्पष्ट आत्महत्या असल्याचे सांगितले होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button