प्रताप सरनाईक यांना मोठा दणका; ‘ईडी’कडून ११.३६ कोटींची संपत्ती जप्त | पुढारी

प्रताप सरनाईक यांना मोठा दणका; 'ईडी'कडून ११.३६ कोटींची संपत्ती जप्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ११.३६ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर ठाण्यातील दोन फ्लॅट्सवर जप्ती आणण्यात आली आहे. एनएसईएल घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई आज (शुक्रवार) केली. दरम्यान, या प्रकरणी ईडीने सरनाईक यांची याआधी चौकशी केली होती.

कोल्हापूर: खाेतवाडीत सात लाखांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

प्रताप सरनाईक यांनी ५ हजार ६०० कोटींचा एनएसईएल घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. दरम्यान आता ईडीने त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. आता सरनाईक यांना अटक होण्याची शक्यता आहे. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरनाईक यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

नाशिक : सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या ; पँटच्या खिशात सापडली सुसाइड नोट

दरम्यान, एनएसईएल घोटाळ्याप्रकरणी ईडीने तपास सुरू केला होता. याबाबत ईडीने प्रताप सरनाईक यांची चौकशी करण्यासाठी त्यांना अनेक नोटीसा पाठविल्या होत्या. याबाबत सरनाईक यांनी म्हटले होते की, ईडीच्या माध्यमातून सुरु असलेल्या चौकशीला मी आणि माझे  कुटुंब संपूर्णपणे सहकार्य करीत आहे. परंतु या सर्वात माझी आणि माझ्या  कुटुंबाची फरफट झाली आहे. मी जी भूमिका मांडली त्यामुळे कोणाच्या तरी सांगण्यावरून चौकशी लावली असली तरी यात माझ्या कुटुंबाचा यात काय दोष होता. त्यामुळे हा सर्व प्रकार वेदनादायी आहे. तसेच माझ्यावर जे काही आरोप करण्यात आलेले आहेत, त्या विरोधात मी न्यायालयात धाव घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

आता या प्रकरणात ईडीने प्रताप सरनाईक यांची ठाण्यातील ११.३५ लाखांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची ठाण्यातील मालमत्ता जप्त केली होती. त्यामुळे शिवसेनेला हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. प्रताप सरनाईक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेत काही जमिनींचा समावेश असल्याचे समजते.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : कशी घेऊयात कानाची काळजी | how to Care for your Ears Properly

Back to top button