मुंबई : 'ईडी'ची कुर्ल्यात छापेमारी, नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ | पुढारी

मुंबई : 'ईडी'ची कुर्ल्यात छापेमारी, नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ

मुंबई पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर अटकेच्या कारवाईनंतर आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सकाळपासून कुर्ला परिसरात छापेमारीला सुरुवात केली. ईडी अधिकाऱ्यांसह सीआरपीएफचे जवानही कुर्ल्यात दाखल झाले. कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंडसह अन्य ठिकाणी ही छापेमारी सुरु असल्याची माहिती मिळते.

कुर्ल्यातील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील तीन एकर जागेत पसरलेल्या गोवावाला कंपाउंड जमीन खरेदी-विक्रीच्या गैरव्यवहारामुळे नवाब मलिक हे सध्या तुरुंगात आहेत. ‘ईडी’च्या छापेमारीमुळे मलिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईडीकडून जागेची पाहणी केली जात असून, कागदपत्रांचाही तपासणी केली जात आहे.

२४ ठिकाणी छापेमारी

प्राप्तीकर खात्याकडून मुंबईतील हिरानंदनी समूहाच्या मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले आहेत. करचुकवेगिरी प्रकरणात ही छापेमारी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. हिरानंदनी समूहाच्या मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईतील एकूण 24 मालमत्तांवर छापेमारी सुरु करण्यात आल्याची माहिती मिळते. प्राप्तीकर खात्याच्या कारवाईने बांधकाम क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

Back to top button