संजय राऊतांच्या तोंडी उद्धव ठाकरे यांची भाषा : किरीट सोमय्या | पुढारी

संजय राऊतांच्या तोंडी उद्धव ठाकरे यांची भाषा : किरीट सोमय्या

मुंबई, पुढारी ऑनलाईन : शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. याच दरम्यान, किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. संजय राऊतांच्या तोंडी उद्धव ठाकरे यांची भाषा का असते? अशा शब्दांत सोमय्या यांनी टीका केली आहे.

किरीट सोमय्यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी सोमय्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधत शिवसेनेच्या नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचे म्हटले. तसेच सोमय्यांनी रश्मी ठाकरे यांनी कोलई गावच्या सरपंचाचांना पत्र पाठवल्याच्या दाव्याचा पुनरूच्चार केला आहे.

मे २०१९ मधील फसवणुकीचे काय झाले?. ठाकरें सरकाकडून जनतेची फसवणूक का केली जातेय? असे अनेक सवाल सोमय्या यांनी उपस्थित केले आहेत. तर पुढे त्यांनी दलालपासून सगळेच फसवणूक करत असल्याचे म्हटले आहे. याच दरम्यान सोमय्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत आमची सुनबाई महाराष्ट्रायीन असल्याचे सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button