समीर वानखेडे यांच्यावर कोपरी पोलिसांत गुन्हा दाखल

Aryan Khan Drugs Case
Aryan Khan Drugs Case
Published on
Updated on

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना ठाणे जिल्हा प्रशासनाने मोठा झटका दिला. त्यांच्या नावे नवी मुंबईत असलेला हॉटेल सद‍्गुरु बार आणि रेस्टॉरंटचा परवाना ठाणे जिल्हाधिकार्‍यांनी रद्द केला आहे. त्यानंतर आता वानखेडे यांच्या विरोधात ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वयाच्या 17व्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्याने उत्पादन शुल्क विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले.

नवी मुंबईतील वाशी येथे समीर वानखेडे यांच्या नावावर हॉटेल सद‍्गुरु बार आणि रेस्टॉरंटचा परवाना आहे. या बारसाठीचा परवाना 27 ऑक्टोबर 1997 मध्ये देण्यात आला होता. या बारचे लायसन्स 31 मार्च 2022 पर्यंत वैध आहे. या ठिकाणी परदेशी बनावटीची तसेच भारतीय बनावटीची विदेशी मद्यविक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हॉटेलचा परवाना आपल्या नावे असला तरी 2006 मध्ये भारतीय महसूल सेवेत दाखल होताच मुखत्यारपत्र वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावे केल्याचा खुलासा समीर वानखेडेंनी यापूर्वीच केला होता. दरम्यान, समीर वानखेडेंच्या जन्मतारखेत म्हणजेच, वयामध्ये विसंगती असल्याचे कारण देण्यात आले आहे. उत्पादन शुल्क विभाग या प्रकरणी चौकशी करीत होते. उत्पादन शुल्क विभागाने ठाणे प्रशासनाकडे आपला अहवाल सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी बार परवाना रद्द करण्याचे आदेश काढले होते.

दरम्यान, वाशी येथील सद‍्गुरु हॉटेल्सच्या लायसन्स मध्ये वयाचा पुरावा नसल्याने काही त्रुटी आढळल्याप्रकरणी नवी मुंबईत वानखेडेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून आता या गुन्ह्याचा तपास कोपरी पोलीस करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news