शिवसेनेकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’! किरीट सोमय्यांकडून राणेंवरील आरोपांचा दाखवला व्हिडिओ | पुढारी

शिवसेनेकडून 'लाव रे तो व्हिडिओ'! किरीट सोमय्यांकडून राणेंवरील आरोपांचा दाखवला व्हिडिओ

मुंबई; पुढारी ऑनलाईन : शिवसेना आणि भाजपमधील आरोपांची धार दिवसागणिक अधिक टोकदार होत चालली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजप प्रवेश करण्यापूर्वी किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर १०० बोगस कंपन्या असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर बेनामी संपत्तीचा आरोप केला होता. तो व्हिडिओच आज शिवसेनेकडून पत्रकार परिषदेत दाखवण्यात आला.

खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर लाव रे तो व्हिडिओ करत व्हिडिओंची मालिका सादर केली. ईडीला घाबरून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा आरोपही राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांनी मराठीला विरोध केला होता असा आरोप पत्रकार परिषदेत केला होता. त्याबाबत आमदार नितेश राणे यांनी किरीट सोमय्यांवर केलेल्या आरोपांचा व्हिडिओही सादर केला.

नारायण राणे यांनी मोदींवर केलेल्या टीकेचा व्हिडिओचा यावेळी सादर करण्यात आला.

नारायण राणेंवर किरीट सोमय्या यांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपांची माहिती ईडीला सादर करणार असल्याचेही राऊत यांनी सागितले. नितेश राणे यांनी आरएसएसवर केलेल्या आरोपांचा दाखलाही विनायक राऊत यांनी दिला.

Video : नारायण राणे काय म्हणाले ?

Back to top button