संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर; नारायण राणेंचा आरोप | पुढारी

संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर; नारायण राणेंचा आरोप

मुंबई; पुढारी ऑनलाईन : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल भाजपवर पत्रकार परिषद घेऊन तोफ डागल्यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रत्युत्तरासाठी पत्रकार परिषद घेतली. राणे यांनी संजय राऊतांना घाम का फुटला होता ? अशी विचारणा केली. संजय राऊत यांची परिस्थिती केविलवाणी परिस्थिती पाहिली असे राणे म्हणाले.

त्यांना आजपर्यंत शिवसेना भवन का आठवलं नाही ? संजय राऊतांना का घाम फुटला होता ?अशी विचारणा केली. नारायण राणे यांनी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत वापरलेल्या शब्दांवरून टीका केली. मर्द आहे म्हणून सांगता, तर आम्ही कुठ विचारलं होत ?

नारायण राणे काय म्हणाले ?

  • संजय राऊत यांचे शिवसेनेत योगदान नाही
  • सेनेत पद नाही, मातोश्रीत कुणी नाही म्हणून राणेंना घाम फुटला
  • शिवराळ भाषा म्हणजे मर्दानगी नव्हे
  • संजय राऊतांचा तोल गेला, त्यांना उपचाराची गरज
  • पत्रकार परिषद घेणे थांबवावे
  • एवढे दिवस सेनाभवन का आठवले नाही
  • संजय राऊत यांची लायकी आहे का
  • विकासावर न बोलता काहीही बोलतात
  • भाजपवर आरोप केल्यास उत्तरासह ईडीला पुरावे देऊ
  • उद्धव ठाकरे सर्वात लाचार मुख्यमंत्री

video : नारायण राणे यांची संपूर्ण पत्रकार परिषद

Back to top button