नवी मुंबईत आगीशी झुंजणारा विदेशी रोबोट दाखल

नवी मुंबईत आगीशी झुंजणारा विदेशी रोबोट दाखल
Published on
Updated on

नवी मुंबई ; राजेंद्र आहिरे : नवी मुंबई अग्‍निशमन विभागाच्या ताफ्यात आता परदेशी बनावटीचा रोबोट दाखल झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे विभागीय अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी पुढारीला दिली.

नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन विभागात आगीवर नियंत्रण मिळवतांना सुदैवाने आजतागायत एकही जीवित हानी झाली नाही. मात्र अशा घटनांमध्ये प्रसंगी अग्निशमन दलाचे जवान जखमी होतात. त्यांच्यासाठी हा रोबोट म्हणजे एक प्रकारे सुरक्षा कवच ठरणार आहे.

फ्रान्स येथील पोक या नामांकित कंपनीकडून हा रोबोट खरेदी करण्यात आला असून त्याची किंमत तबब्ल 85 लाख रुपये आहे. हा रोबोट अडीचशे ते तीनशे मीटर अंतरावरून ऑपरेट करता येतोे. ज्या अरुंद ठिकाणी मनुष्य शिरणार नाही अशा धोकादायक प्रसंगात रोबोट रिमोट कंट्रोल माध्यमातून आत प्रवेश करून धगधगत्या ज्वालांवर पाणी फवारणार आहे.

* या रोबोटला दोन बॅटर्‍या असून तो तब्बल 4 तास आगीशी सामना करू शकतो.
* रासायनिक वा ज्वलनशील पदार्थांना आग लागल्यास त्या आगीवर आता सहज नियंत्रण मिळवता येईल.
* खासगी आणि सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती, तळघर अशा ठिकाणी आग विझवण्यासाठी या मशीनचा वापर केला जाणार आहे.
* आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या इमारतीवर रोबोट जलदगतीने सरसर चढू शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news