Burning Truck : मुंबई अहमदाबाद महामार्गावर चालत्या बर्निंग ट्रकचा थरार

Burning Truck : मुंबई अहमदाबाद महामार्गावर चालत्या बर्निंग ट्रकचा थरार
Published on
Updated on

खानिवडे; पुढारी वृत्तसेवा : मुंबई – अहमदाबाद महामार्गावरील (Burning Truck) भालिवली ते शिरसाड (ता.वसई,जि.पालघर) दरम्यानच्या मुंबई मार्गिकेवर शुक्रवारी (दि.२८) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एक ट्रक आग लागलेल्या अवस्थेत भरधाव वेगाने शिरसाडकडे जात असताना स्थानिकांच्या नजरेस पडला.

भरधाव वेगाने जाणारे हे वाहन पाहून स्थानिक रहिवाश्यांनी सदर ट्रकच्या (Burning Truck) मागे दुचाकी आणि अन्य वाहनाद्वारे जाऊन शिरसाड नाक्याच्या अगोदर थांबलेल्या या पेटत्या ट्रकची आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आग आटोक्यात आणल्यानंतरही ट्रकमध्ये आग धुमसत असल्याने घटनास्थळी आलेल्या वसई – विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर ट्रक रस्त्याच्याकडेला असलेल्या मोकळ्या मैदानात नेवून आग शमवण्याचे काम सुरु केले. या घटनेत जीवितहानी झाली नसून वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

एमएच ०४ इ-एल ९३८३ या क्रमांकाचा आयशर ट्रक (Burning Truck) महामार्गावरील भालिवली गावातून साधारण आग लागलेला अवस्थेत भरधाव वेगाने महामार्गावरुन शिरसाडकडे येत होता. या ट्रक चालकाला पाठीमागून आग लागली असल्याचे काही दुचाकी चालकानी सांगितले.

या चालकाने गाडीला लागलेली आग विझवता यावी म्हणून पाणी व्यवस्था असलेल्या महामार्गावरील सर्व्हिस स्टेशन गाठण्यासाठी गाडी भरधाव हाकत नेऊ लागला, असं समजते. मात्र, या प्रयत्नात चालत्या गाडीला वारे लागल्याने खानिवडे गावाच्या हद्दीतून जात असताना आगीने रोद्ररूप धारण केले. तरीही त्याच अवस्थेत चालकाने गाडी भामटपाडा येथील सर्व्हिस सटेशनजवळ नेली व तेथे जळणारी गाडी सोडून पळून गेला. यावेळी सदर गाडीचा पाठलाग करत आलेले खानिवडे येथील तरुण व भामंटपाडा शिरसाड परिसरातील स्थानिकांनी पाणी व्यवस्था करत आग शमविण्यास सुरुवात केल्याने आग बऱ्याच अंशी शमली.

या ट्रकमध्ये भाताचा सुका पेंढा होता. हा पेंढा आग लागताच वेगाने पेटू लागला. याचवेळी घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर पेटता ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या मैदानात नेवून आग आटोक्यात आणण्यात आली. ट्रकची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news