National Voters Day : 'सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणूका' | पुढारी

 National Voters Day : 'सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणूका'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

मतदान… लाेकशाहीमध्‍ये सर्वसामान्‍यांना सत्ताधीश करणारा अधिकार.  आज आपण १२ वा राष्ट्रीय मतदार दिन (National Voters Day) साजरा करत आहोत. याच दिवशी म्हणजे २५ जानेवारी १९५० ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. याच स्थापना दिवसानिमित्त २०११ पासून आपण दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी केंद्रीय निवडणूक आयोग  एक संकल्पना निश्चीत करुन विविध कार्यक्रम राबवून मतदानाबाबत जनजागृती करत असतो. २०२२ ची संकल्पना ही ‘सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणूका’ (Making Elections Inclusive, Accessible and Participative) ही आहे.

National Voters Day भारत हा सर्वात मोठी लोकशाही असलेला देश 

भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश. लोकशाही व्‍यवस्‍थेतचा पाया हा मतदारच असतो. भारतात १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे. ( National Voters Day) कोणत्याही नागरिकाला त्याचा धर्म, जात, लिंग, वर्ण, संप्रदाय अशा कारणास्त भेदभाव केला जात नाही, वंचित ठेवले जात नाही. भारतीय संविधानाने दिलेला हा हक्क बजावून जेव्हा मतदार सूज्ञपणे सुजाण व लोकाभिमुख नेतृत्वाला निवडून देईल तेव्हा निश्चीतचं लोकशाहीला बळकटी मिळते.

मतदारांची लोकशाहीतील सक्रियता

National Voters Day मतदारांचा लोकशाहीतील सक्रियता वाढवणे, मतदारांमध्‍ये लोकशाही, मतदानाबद्दल जागृती करणे हे राष्ट्रीय मतदार दिनाचे उद्दिष्ट असते. जेव्हा लोकसहभाग वाढेल तेव्हा लोकशाही नक्कीच अखंड राहून बळकटीकरण होण्यास मदत होईल. हक्काबरोबर जबाबदारी येत असते हे आपण लक्षात घेवून प्रत्येकाने एक जबाबदार आणि सूजाण नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावायलाच हवा.

पाहूया, मतदार दिनानिमित्त लोकप्रतिनिधी आणि मतदारांना काय वाटतं मतदानाबद्दल…

एक ‘मत’ अधिकार सर्वांचा, मताधिकारातून व्यक्त होण्याचा! जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी संपूर्ण देशात २५ जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा केला जातो. अजूनही आपल्याकडे सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचे प्रमाण सरासरी ५० ते ७५ टक्यांदरम्यान असते. हे वास्तविक १०० टक्के झाले पाहिजे, असे मला वाटते. प्रत्येकाने निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावून जागरुक व सुजाण मतदार बनण्याचा संकल्प केला पाहिजे.

माजी आमदार अमल महाडीक

स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणारी विद्‍यार्थींनी तेजस्विनी गायकवाड म्हणते, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही  देश आहे. मात्र आपल्‍याकडे मतदानाच्या अधिकाराबाबत म्हणावी तितकी जागृती दिसून येत नाही; पण खरी लोकशाही टिकवायची असेल तर देशातील प्रत्‍येक मतदानास पात्र असलेल्‍या नागरिकांनीच आपल्‍या या अमूल्‍या अशा अधिकाराबाबत जनजागृती करणे गरजेचं आहे. माझ्या-तुमच्या एका मताने लोकशाही समतोल ठेवू शकतो; पण आपल्‍या एका मताने काय होणार आहे, ही संकूचित वृत्ती लोकशाहीला घातक ठरू शकते.

      आज कालची मतदानची अवस्था बघितली तर वेगळ्या दिशेने चाललेले आहे, असे चित्र आहे. मतदान करताना  उमेदवार पुढील पाच वर्षांमध्ये काेणते विकास कामे करणार आहे.  वाढती बेरोजगारी, शिक्षण व्यवस्थेतील प्रश्‍न आणि भ्रष्टाचार या मुद्‍यांवर कणखर मत मांडणारा  आहे का, याचा विचार करुन सक्षम उमेदवाराच्या पाठीमागे आजच्या युवकांना उभा राहिलं पाहिजे .

सौरभ राजू शेट्टी

राज्यशास्त्राचा अभ्यासक सुशांत माळवी म्‍हणाले की, योग्य निर्णय प्रक्रियेद्वारे देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावे यासाठी जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम असणे गरजेचे आहे. त्यासाठी मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे तेवढेच आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थी व युवक,युवतींनी मोठ्या प्रमाणात मतदार यादीमध्ये आपली नावे नोंद करावीत आणि मतदानाचा दिवशी मतदान करून लोकशाही बळकट करावी.

 तुम्ही आम्ही केलेल्या एका एका मताच्या माध्यमातून लोकशाहीतील राजा (लोकप्रतिनिधी) जन्माला येत आहे. म्हणून पाच वर्षांनी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये योग्य वैचारिक आणि सर्वांगीण विकासाची भूमिका घेणारा पारदर्शक आणि कार्यक्षम उमेदवार निवडून  देण्‍यासाठी मतदान हक्‍क बजावणे गरजेचे आहे.

ऋतुराज रवींद्र देशमुख, सरपंच  ( घाटणे ता. मोहोळ )

ऋतुराजने लहान वयात मिळालेल्या नेतृत्व संधीचा उपयोग करत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विधिध उपक्रम राबवले आहेत. कोरोना काळातील त्याच्या कामाचे कौतूक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले होते.

 

पाहा व्हिडिओ; थकलेल्या वृद्ध एसटी कर्मचाऱ्यांची आर्त हाक ! | ST Workers senior citizens story

Back to top button