मुंबई : दिल्लीपेक्षा माझगावची हवा प्रदूषित; श्‍वास घेणेही कठीण | पुढारी

मुंबई : दिल्लीपेक्षा माझगावची हवा प्रदूषित; श्‍वास घेणेही कठीण

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : बुधवारी मुंबई तील माझगावमध्ये हवेचा गुणवत्ता स्तर तर अतिशय वाईट असल्याचे दिसून आले. माझगाव मध्ये हवेचा गुणवत्ता स्थर 322 एक्यूआयवर पोहचला आहे. त्यामुळे दिवसभर मुंबइतील अनेक भागात प्रदुषणाच्या धुक्याची चादर परलेली दिसून आली. अशा वातावरणामुळे श्वसनाचे आजार असलेल्यांच्या श्वास घेण्यात अडचणी निर्माण होउ शकतात अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत वातवरणात गारवा जाणवत आहे. अशा काळात जमिनिकडून समुद्राकडे वारे वाहू लागतात. आणि ज्या परिसरात काही जास्त गारवा असतो अशा ठिकाणी तर हे धूलिकण जमिनीलगत हवेत तरंगतात. आणि प्रदूषणाची पातळी वाढू लागते तर हवा गुणवत्ता निर्देशांकाची पातळी खालावते. असे सफर या हवेच्या गुणवत्तेची नोंद करणार्या प्रणाली अहवालातून समोर आले आहे.

मुंबईतील माझगाव परिसरात हा स्थर अतिशय वाईट म्हणजेच 322 एक्यूआयवर असल्याची नोंद करण्यात आली आहे. तर दिल्ली संपूर्ण शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (ऐक्यूआय ) 318 नोंदण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील माझगाव येथील हवा गुणवत्ता निर्देशांक दिल्लीपेक्षाही खालावलेल्या स्थितीत दिसून आला.

थंडीच्या दिवसात जमिनिकडून समुद्राकडे वारे वाहू लागतात. त्यामुळे धूलिकण वाहून न जाता जमिनीलगत हवेत तरंगतात. आणि प्रदूषणाची पातळी वाढू लागते हे याचे प्रमुख कारण आहे. मुंबईतील अन्य ठिकाणांपेक्षा माझगाव मध्ये 1ते 2 डिग्री सेल्सियस तापमान कमी असते. त्यात तिथे रस्ते, पर्जन्यवाहिन्यांच्या कामासोबत विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने ही पातळी अनेकदा अतिशय वाईट स्थरावर जात असल्याचे सफर संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ. गुरफान बेग यांनी सांगितले.

Back to top button