गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी सायंकाळी दिली. लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
त्यांच्या प्रकृतीमध्येही हळूहळू सुधारणा होत आहे. मात्र प्रकृतीत सुधारणा होत असली त्या पूर्ण बर्या झाल्याशिवाय त्यांना डिस्चार्ज दिला जाणार नसल्याची माहिती ब्रीच कँडीच्या डॉक्टरांकडून देण्यात आली. दरम्यान आम्ही लता दीदी लवकर बर्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना करत आहोत. त्या आम्हाला आईसारख्या आहेत, असे त्यांची धाकटी बहीण आणि सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी सांगितले. त्यांच्या
पेडर रोडवरील प्रभू कुंज या निवासस्थानी ‘शिवरुद्र’ आणि इतर पूजाविधी सुरू असल्याचेही आशा भोसले म्हणाल्या.
हे ही वाचलं का ?