आणखी 6 महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त दर्जा

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांची संख्या राज्यात सर्वाधिक
Empowered autonomous status to 6 more colleges
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांची संख्या राज्यात सर्वाधिकMumbai University File Photo

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित आणखी 6 स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांचा दर्जा देण्यात आला आहे. यापूर्वी 12 महाविद्यालयांना हा दर्जा देण्यात आला असून आता ही संख्या आता 18 वर गेली आहे. यामुळे मुंबई विद्यापीठाशी संलग्नित अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांची संख्या राज्यात सर्वाधिक झाली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मधील कलम 123 मध्ये नमूद अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाच्या तरतूदीच्या अनुषंगाने स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा देण्यासंदर्भात मानके व कार्यपद्धती निश्चित करून महाराष्ट्र शासनातर्फे एकरूप परिनियम 22 मे, 2023 च्या अधिसूचनेनुसार निर्गमित करण्यात आले. त्यानुसार मुंबई विद्यापीठाने 15 मे 2024 रोजी परिपत्रक काढून स्वायत्त महाविद्यालयांकडून अर्ज मागविले होते. विद्यापीठास प्राप्त झालेल्या एकूण 7 अर्जांची रितसर दुबार छाननी करून एकूण 6 स्वायत्त महाविद्यालयांचे अर्ज पात्र करण्यात आले. सर्व पात्र अर्ज विद्या परिषदेच्या शिफारशीने व्यवस्थापन परिषदेने मान्य केले आहेत.

Empowered autonomous status to 6 more colleges
किमोथेरपीचा पहिला फोटो शेअर; हिना खानवर उपचार सुरु

अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांना नवीन प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करणे अधिक सुलभ होणार आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या मंजूरीने पीएचडीचे अभ्यासक्रम सुरु करणे, अभ्यासक्रमांची शुल्क रचना करणे अशा अनुषंगिक बाबींसाठी स्वातंत्र्य मिळणार आहे.

Empowered autonomous status to 6 more colleges
अवैध धर्मांतर सुरु राहिल्‍यास बहुसंख्‍याक अल्‍पसंख्‍याक होतील : हायकाेर्ट

अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांत सुरु असलेल्या अभ्यासक्रमांची पूनर्रचना करणे, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नामाभिधान याप्रमाणे अभ्यासक्रमांची नावे बदलणे, मूल्यांकनाची पद्धत विहित करणे, निकाल जाहीर करणे, गुणपत्रक बहाल करणे याचीही मूभा मिळणार आहे.

Empowered autonomous status to 6 more colleges
Parliament Monsoon Session|'सत्य हे सत्यच असते'; विरोधी पक्षनेते राहुल गांधी

नवीन अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालये

  • डी. जे. सांघवी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग, विलेपार्ले

  • आर.ए. पोदार महाविद्यालय, माटुंगा

  • ठाकुर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, कांदिवली

  • मॉडेल कॉलेज, डोंबिवली

  • एन.एम.कॉमर्स अँड इकोनॉमिक्स कॉलेज, विलेपार्ले

  • कॉलेज ऑफ सोशल वर्क, निर्मला निकेतन, मरिन लाईन्स

राज्यात सर्वाधिक 18 अधिकारप्रदत्त महाविद्यालये आणि 80 स्वायत्त महाविद्यालये ही मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असून शैक्षणिक स्वायत्तेकडे मुंबई विद्यापीठाने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.

-प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाच्या दर्जासाठी मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या स्वायत्त महाविद्यालयांनी सर्वाधिक केलेले अर्ज ही स्वागतार्ह बाब आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात या महाविद्यालयांचा प्रागतिक दृष्टिकोन दिसून येतो.

-प्राचार्य डॉ. अजय भामरे, प्र-कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news