सखूबाई शिंदे खुन प्रकरण : राजू उर्फ टूल्ल्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी

सखूबाई शिंदे खुन प्रकरण : राजू उर्फ टूल्ल्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी
Published on
Updated on

केज (बीड) ; पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील नांदूरघाट येथील हंगेवाडीच्या पारधी वस्तीवर झालेल्या वृद्ध महिलेचा खून प्रकरणातील आरोपी राजू उर्फ टूल्ल्या बन्सी काळे याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २१ जानेवारी रोजी केज तालुक्यातील नांदूरघाट येथील हंगेवाडीच्या पारधी वस्तीवर सखुबाई बन्सी शिंदे या वृद्ध महिलेचा खून झाला. तिचा भाचा राजू उर्फ टूल्या काळे याने दारू गांजाच्या नशेसाठी तिने पैसे न दिल्यामुळे तिचा गळा आवळून व डोक्यात दगड मारून खून केला होता.

त्याला पोलीसांनी अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथून ताब्यात घेतले. मारेकरी राजू उर्फ टूल्ल्या बन्सी काळे याला पोलीसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news