शेतकरी राजाच्या आनंदाला उधाण, बैलपोळा उत्साहात साजरा

शेतकरी राजाच्या आनंदाला उधाण, बैलपोळा उत्साहात साजरा

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : गेल्या वर्षी बैलपोळा साजरा करताना निर्बंध असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. अगदी साध्या पद्धतीने सण साजरा करण्यात आला होता. परंतु यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज (दि. २६ ऑगस्ट) पोळ्या निमित्ताने तालुक्यातील विविध ठिकाणी सण साजरा करण्यात आला. बैलपोळ्यानिमित्त काही सधन शेतकऱ्यांनी वाजत गाजत आपल्या पशुधनाच्या शहरातून मिरवणुका काढल्या. या मिरवणुकीमध्ये भगवे फेटे बांधुन वृध्द शेतकऱ्यासह तरुण शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वर्षभर शेतात शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी अपार कष्ट करण्याऱ्या शेतकऱ्यांचा सच्चा मिञ म्हणजे बैल. बैलपोळ्याच्या दिवशी गळ्यात चंगाळी, शिंगाना कलर, अंगावर कलरने विविध प्रकारची सजावट, अंगावर झुली या पध्दतीने पोळ्यानिमित्त सजवुन बैलांची व इतर पशु धनाची शहरातून शेतकऱ्यांकडून मिरवणुका काढण्यात आल्या. घरात पुरणपोळीचा स्वयंपाक करुन बैलाची पुजा करुन बैलाना पुरणपोळी खाऊ घालण्यात आली. वर्षभर शेतातील विविध कामात शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा बैलपोळ्याचा सण साजरा करण्यात येतो. यावर्षी मागील काही आठवड्यांपासुन पावसाने उघडीप दिली आहे. परंतु, गोगलगाईच्या मुळे उत्पन्नात मोठी घट होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहेत. माञ तरीही बैलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठ्या उत्साहात शेतकऱ्यांनी हा सण साजरा केला.

बैलपोळ्या निमित्त शेतकऱ्यांकडून उपवास

बैलांना सायंकाळी पुरणपोळीचे जेवण दिल्यानतंरच शेतकरी जेवण करतात. शेतकऱ्यांनी बैलाची सजावट करुन सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बैलाची व इतर पशुधनाची विधीवत पुजा केली. बैलांना व इतर पशुधनाला पुरणपोळीचे जेवण दिल्यानंतर शेतकऱ्यांनी जेवण करुण उपवास सोडला.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news