लातूर : देवणी तालुक्यात परतीच्या पावसाचा जोर वाढला

लातूर : देवणी तालुक्यात परतीच्या पावसाचा जोर वाढला

सतीश बिरादार; देवणी : तालुक्यात परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे.तालुक्यातून जाणार्‍या मांजरा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने शुक्रवारी सकाळपासूनच सिंधीकामट व लखनगाव , सोनाळ दरम्यान असलेल्या मांजरा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गाची वाहतूक ठप्प झाली आहे. बटनपूरसह परिसरातील गावातील शिवारात शेकडो हेक्टरवर पुराचे पाणी घुसले आहे. परिणामी खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

यंदा खरिपाच्या पेरण्या झाल्या न झाल्या तोच पावसाने सर्वत्र पाणीच पाणी करीत कोवळ्या पिकांची नाही केली व त्यानंतर तब्बल एक महिना विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या चार ते पाच दिवसांपासून
ठिकठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस पडत असल्याने ओढे, नाले, नदी दुथडी भरून वाहत आहेत. याचा सर्वाधिक फटका शुक्रवारी मांजरा नदीला आलेल्या पुराने बटनपूरसह परिसरातील गावांना बसला आहे. शेकडो हेक्टर खरिपाची पिके पाण्याखाली आहेत.
मांजरा नदीच्या आलेल्या पुराच्या पाण्यात बटनपूर येथील शंभर हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. बटनपूर शिवारात मांजरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात अमर बिरादार, नीलेश बिरादार, राचप्पा बिरादार, सजीव बिरादार, सुनील बिरादार,
सूर्यकांत सातबिगे, शिवराज खराबे, नागशेट्टी खराबे, बसवराज जाणते, सगंशेट्टी जाणते, बालाजी बिरादार, राजकुमार भुसारे, संजीव भुसारे, विजय भुसारे, शिवकांत भुसारे, संगशेट्टी मलशट्टे, राचप्पा मलशट्टे, श्रीकांत कारभारी, शिवशंकर कारभारी, अजय शेनारे, ओमकार सातबिगे, रमेश मलशट्टे, फाल्गुन कन्नाडे, मनोज मलशेट्टे, सतीश मलशेट्टे, माधव मलशेट्टे यांच्यासह आदी शेतकर्‍यांची पिके पाण्याखाली गेली आहेत.

तालुक्यात आतापर्यंत 694.33 मि.मी. पाऊस देवणी तालुक्यात आतापर्यंत 694.33 मि.मी.पावसाची सरासरी नोंद झाली आहे. तालुक्यातील देवणी मंडळात शुक्रवारी 50(744) मि.मी. तर बोरोळ मंडळात सर्वात कमी 34(594) मि.मी. नोंद झाली आहे.तर वलांडी मंडळात 60(740) मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी सुरू झालेला रिमझिम पाऊस शनिवारी दिवसभर सुरू असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news