

जालना, पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणार्याघनसावंगी तालुक्यातील कोठाळायेथील आरोपी अशोक गुलाबराव वाघमारे यास अतिरिक्त जिल्हा सह न्यायाधीश प्रल्हाद सी. भगुरे यांनी दहा वर्ष शिक्षा व दंड अशी शिक्षा ठोठावली. घनसावंगी तालुक्यातील कौठाळा येथील अशोक वाघमारे याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवळी अत्याचार केला.
याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी घनसावंगी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवील्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पिडितेचा जबाब नोंदवून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले.
ज्यात फिर्यादी साहेबराव सरोदे पिडिता, डॉ. गणेश राठोड, मुख्याध्यापक सी.जी. बिराजदार, ए. पी. लव्हार, तपासणिक अमलदार डी. डी. धुमाळ यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायाधीश प्रल्हाद सी. भंगुरे यांनी आरोपी अशोक वाघमारे यास दहा वर्ष शिक्षा व दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड.वाल्मीक घुगे यांनी काम पाहीले.