परभणी : रानडुकराची दुचाकीला धडक; एकजण ठार

परभणी : रानडुकराची दुचाकीला धडक; एकजण ठार
Published on
Updated on

चारठाणा; पुढारी वृत्तसेवा : संभाजीनगर-नांदेड महामार्गावरील हलवीरा पाटी येथील गजानन महाराज मंदिरा जवळ दुचाकीला रानडुकराने धडक दिली. यामध्ये जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली. भास्कर रथकर (वय 43) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील जोगवाडा येथील रहिवाशी असलेले भास्कर रथकर व भारत रथकर दोघेजण जोगवाडा येथुन चारठाणा येथे दुचाकीवरून जात होते. संभाजीनगर रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ अचानक रानडुकर चालत्या दुचाकीला धडकल्यामुळे दोघेजण खाली कोसळले. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉ. देविदास गरड यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. उपचारा दरम्यान भास्कर रथकर याचा मृत्यू झाला तर भारत रथकर (वय 47) याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news