नांदेड : ज्ञानराज चौगुले, सावंत, कल्याणकर नॉट रिचेबल

नांदेड : ज्ञानराज चौगुले, सावंत, कल्याणकर नॉट रिचेबल
Published on
Updated on

नांदेड/उस्मानाबाद, पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्ह्यातील एक आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन असे शिवसेनेचे आमदार मंगळवारी नॉट रिचेबल राहिल्याने सोशल मिडियावरुन दिवसभर तर्कवितर्क मांडले जात आहेत.

उस्मानाबादेतील आ. ज्ञानराज चौगुले हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांची आमदारकीची तिसरी टर्म सुरु आहे. प्रा. तानाजी सावंत हे पक्षात उशिराने आले अन् पालकमंत्रीही झाले होते. मात्र तेही नॉटरिचेबल असल्याने सामान्य शिवसैनिक बुचकळ्यात पडल्याचे चित्र मंगळवारी दिवसभर होते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने त्यांच्यासोबत कोणकोणते आमदार आहेत, याबाबत दिवसभर एकमेकांकडे शिवसैनिक चौकशी करीत होते. शिवाय प्रत्येकजण आ. चौगुले तसेच आ. सावंत यांना मोबाईलवरुन संपर्क साधण्याचाही प्रयत्न करीत होते. दुसरीकडे नांदेड उत्तरचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर हे सुद्धा त्यांच्यासमवेत आहेत. आ. कल्याणकर नॉट रिचेबल असल्याने हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना धक्का असल्याचे मानले जात आहे. आ. कल्याणकर यांची एकनाथ शिंदे यांचे एकनिष्ठ अशी ओळख आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news