

किनवट, पुढारी वृत्तसेवा : सिरमेट्टी मार्गावरून अवैध सागवानाची वाहतूक करतांना 14 पैकी दोन सागी तस्करांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडील सागवानाचे 14 नग जप्त करण्यात आले आहेत. ही घटना गुरुवारच्या मध्यरात्रीनंतर घडली.
गुरूवार (दि.23) रोजी रात्री किनवट सिरमेट्टी मार्गावर अधिकार्यांसह वनकर्मचारी दबा धरून बसले होते, यावेळी 14 अनोळखी व्यक्ती डोक्यावर बेकायदेशीररित्या कत्तल केलेल्या सागवानी लाकडाचे चौपाट केलेले 14 कटसाईज लाकूड किनवट शहराच्या दिशेने आणतांना दिसले. त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, सागवान जागीच टाकून अंधाराचा फायदा घेत बाराजण पसार झाले, दोन सागी तस्करांना पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. उपवनसंरक्षक वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक जी.डी. गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली किनवटचे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) पी. एल. राठोड तसेच नवनियुक्त वन परिमंडळ अधिकारी एस. एम. कोंपलवार, वनरक्षक एस. एन. सांगळे, जी. टी. माझळकर,टी. आर. घोडके वनरक्षक फिरते पथक, लेखापाल एम. जे. गंगलवाड, वनसेवक भावसिंग
जाधव, तसेच वाहन चालक बाळकृष्ण आवले आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.