कुटुंब कलह
कुटुंब कलह

औरंगाबाद : वेडसर महिलेला मारहाण करीत अत्याचार, नराधमास अटक

Published on

शिऊर, पुढारी वृत्तसेवा : वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे एका वेडसर महिलेला मारहाण करीत, एका नराधमाने अत्याचार केला. ही संतापजनक घटना शिऊर बंगला ते शिऊर मार्गावरील एका हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेवर रविवार (दि.19) सायंकाळी घडली. सोमवारी (दि.20) सकाळी ही घटना उघडकीस आली.

याप्रकरणाचा जलद गतीने तपास करीत शिऊर पोलिसांनी आरोपीला अवघ्या दोन तासांत अटक केली. पीडितेच्या भावाने सोमवारी सकाळी शिऊर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिऊर पोलिसांनी जलद गतीने तपास करीत अवघ्या दोन तासांत आरोपीला अटक केली.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव प्रेमसिंग मन्साराम मेवाळ असे आहे. पीडित महिलेच्या भावाने सकाळी शिऊर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी तपासाची चक्रे फिरवीत माहिती घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असताएक बूट सापडला. या बुटाची तपासणीकरिता वेगवेगळी पथके नेमण्यात आली.

तसेच घटनास्थळी श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले. तपासणीत तरट्याची वाडी येथून बुटाच्या जोडासह घटनेतील आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक पवन बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिऊर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक नागटिळक, योगेश पवार, अविनाश भास्कर, अमोल कांबळे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news