file photo
file photo

औरंगाबाद जिल्ह्याच्या क्रीडा अधिकारी निलंबित

Published on

पुणे, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत शहरात वितरित करण्यात आलेल्या क्रीडा साहित्यातील गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत महाराष्ट्र शासनाचे उपसचिव सुनील हंजे यांनी आदेश काढले आहेत. नावंदे यांचा कार्यभार औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुलाचे उपसंचालक यांच्याकडे तात्पुरता सोपविण्यात आला आहे. या निलंबनाच्या कार्यकाळात त्यांना निर्वाह भत्ता देण्यात येणार असून, खासगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही, असेही या आदेशात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news