औंढा नागनाथ : बस-दुचाकीच्या अपघातात १ जण जागीच ठार

औंढा नागनाथ : बस-दुचाकीच्या अपघातात १ जण जागीच ठार
Published on
Updated on

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पिंपळदरी शिवारात भरधाव एसटी बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना काल (गुरुवार) दुपारी चार वाजता घडली. रमेश वाढवे (वय ४२, रा. मसोड, ता. कळमनुरी) असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील रमेश वाढवे हे गवंडी काम करतात. गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ते पिंपळदरी मार्गे औंढा नागनाथकडे जात होते. यावेळी औंढा नागनाथ ते कळमनुरी हि पिंपळदरी मार्गे धावणारी बस कळमनुरीकडे जात होती. ही बस पिंपळदरी शिवारात आली असतांना चौफुलीवर बसची दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार रमेश हे बसच्या खाली सापडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पिंपळदरीचे सामजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे, निवृत्ती खिल्लारे यांच्यासह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी मृताच्या जवळ असलेल्या मोबाईलवरून लावण्यात आलेल्या शेवटच्या मोबाईल नंबरवर संपर्क केला असता, तो मोबाईल रमेश वाढवे यांचा संपर्कक्रमांक असल्याचे समोर आले. या अपघाताची माहिती कळमनुरी पोलिसांना मिळाल्यानंतर जमादार शालीग्राम अंभोरे गावकऱ्यांनी मृताच्या जवळ असलेल्या मोबाईलवरून लावण्यात आलेल्या शेवटच्या मोबाईल नंबरवर संपर्क केला.

तो मोबाईल रमेश वाढवे यांचा संपर्कक्रमांक असल्याचे समोर आले. या अपघाताची माहिती कळमनुरी पोलिसांना मिळाल्यानंतर जमादार शालीग्राम अंभोरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी उशिरा मृतदेहावर पिंपळदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी केली. पथकाने घटनास्थळी धाव घेत सायंकाळी उशिरा मृतदेहावर पिंपळदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी केली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news