हिंगोली: वसमत येथे अज्ञातांच्या बेदम मारहाणीत तरूण ठार

हिंगोली: वसमत येथे अज्ञातांच्या बेदम मारहाणीत तरूण ठार
Published on
Updated on

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : वसमत शहरातून एका १८ वर्षीय युवकास टाकळगाव शिवारातील शेत आखाड्यावर नेऊन अज्ञातांनी जबर मारहाण केली. त्यानंतर जखमी युवकास वसमत शहराजवळ सोडून देत आरोपींनी पळ काढला. दरम्यान, जखमी युवकास उपचारासाठी नांदेड येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषीत केले. ही घटना मंगळवारी (दि.१६) रात्री घडली.

वसमत शहरातून मंगळवारी रात्री ८.३० च्यादरम्यान ओंकार हेरे (वय १८, रा. नविन इरिकेशन कॉलनी, कन्हेरगाव, वसमत) या युवकास अज्ञातांनी टाकळगाव शिवारातील आखाड्यावर नेले. येथे त्याला जबर मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या ओंकारला वसमत शहरातील एका शाळेजवळील शेतात टाकण्यात आले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नातेवाईकांनी धाव घेतली. गंभीर जखमी युवकास नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून ओंकारला मृत घोषीत केले. माहिती मिळताच सपोनि अनिल काचमांडे, फौजदार संदिप यामावार, अविनाश राठोड, संजय गोरे आदी कर्मचाऱ्यांनी टाकळगाव शिवारातील आखाड्यावर जाऊन पाहणी केली. तरुणास कोणी आणि का मारहाण केली ? याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, काही आरोपी वसमत शहरातील असल्याची माहिती आहे. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news