वाशिम : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एक ठार, एक जखमी

file photo
file photo

वाशिम ; पुढारी वृत्‍तसेवा समृद्धी महामार्गावर 26 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या दरम्यान नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या मोटारीने समृद्धीवर उभ्‍या असलेल्या कंटेनरला मागील बाजूने धडक दिली. या अपघातात एक जन जागीच ठार झाला असून, चालक गंभीर जखमी झाला आहे.

समृद्धी महामार्गांवर मालेगाव हद्दीत 233 वर दि.26 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या दरम्यान नागपूरहून पुण्याला जात असलेल्या मोटारीने महामार्गावर उभ्या कंटेनरला पाठीमागुन धडक दिली. यामध्ये एक ठार तर एक जखमी झाला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news