हिंगोली: जवळाबाजार ग्रा.पं. पोटनिवडणुकीत वाजेद गौस शेख विजयी

हिंगोली: जवळाबाजार ग्रा.पं. पोटनिवडणुकीत वाजेद गौस शेख विजयी
Published on
Updated on

जवळाबाजार, पुढारी वृत्तसेवा : येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत एकता ग्रामविकास पॅनलचे वाजेद गौस शेख उर्फ गुडु ८१० मतांनी विजयी झाले. तर शाहबाज खान पठाण यांना ३७३ मते पडले. औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयात आज (दि.१९) मतमोजणी झाली.

ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक ६ मध्ये रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. गुरूवारी (दि.१८) मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत वाजेद गौस शेख विरुद्ध ताहेर खान शहाबाज खान पठाण यांच्यामध्ये लढत झाली. एकूण १९९५ पैकी १७७२ मतदान झाले.

पोटनिवडणुकीत वाजेद गौस शेख विजयी झाले आहेत. ते मुनीर पाटील यांच्याकडून पोटनिवडणुकीत उभे होते. पोटनिवडणुकीनंतर ग्रामपंचायतीतील सत्ता समीकरणे बदलली आहेत. मुनीर पाटील यांच्या पॅनलचे ९ सदस्य, तर राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप आघाडीकडे ८ सदस्य आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news