

किनगाव, पुढारी वृत्तसेवा : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील दोघांचा कांगणेवाडी ( ता. आंबेजोगाई जि. बीड) जवळ अपघात झाला. यात दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी ( दि.१०) सायंकाळी घडली.
सविस्तर माहिती अशी की, सूर्यकांत नरहरी गायकवाड (वय ४५) व महेताब अल्लाबक्ष शेख (वय ३८, दोघेही रा. किनगाव ता. अहमदपूर) येथील रहिवासी असून शुक्रवारी सायंकाळी कामानिमित्त धर्मापुरी येथे गेले होते. परत येताना संध्याकाळी ७ सुमारास बीड जिल्ह्यातील कांगणेवाडी जवळ अपघात झाला. यानंतर दोघांना आंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हा अपघात कशाला धडकून झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.