नांदेड परिक्षेत्रातील ५८ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या, विशेष पोलीस महानिरीक्षकांनी काढले आदेश

नांदेड परिक्षेत्रातील ५८ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या, विशेष पोलीस महानिरीक्षकांनी काढले आदेश
Published on
Updated on

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : नांदेड परिक्षेत्रातील 58 पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून या बदल्यांचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. शशीकांत महावरकर यांनी नुकतेच काढले आहेत. या बदल्यांमुळे नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर जिल्हयातील पोलीस दल ढवळून निघाले आहे.

या बदल्यांमध्ये नांदेडचे उपनिरीक्षक बाळू चोपडे, शिवानंद स्वाामी, गजानन कागणे, कपील आगलावे, चित्तरंजन ढेमकेवाड, दशरथ आडे, प्रसनजीत जाधव, मिथून सावंत यांची हिंगोली येथे बदली झाली आहे. नांदेडच्या पुनम सुर्यवंशी, अनिल कांबळे, लक्ष्मण बोधनवाड, दत्तात्रय काळे, साईनाथ सुरवसे, चंदनसिंह परिहार, सचिन सोनवणे, विशाल सुर्यवंशी, सोपान थोरवे, हनुमंत घुले, सविता रायपल्ले, परशुराम देवकते यांची लातुर येथे बदली झाले आहे.नांदेडच्या राणी भोंडवे, गोपीनाथ वाघमारे, दिनेश येवले, तुळशीराम चिट्टेवार, गमेश पवार, गणेश सवंडकर, शिवप्रसाद कऱ्हाळे यांची परभणी येथे, तसेच परभणीच्या राधिका भावसार, टोपाजी कोरके, मारोती चव्हाण, नागनाथ तुकडे, हनुमंत नागरगोजे, साईनाथ पुयड, बाबु गिते, संदीप भोसले, व्यंकट कुसमे यांची नांदेड येथे बदली झाली आहे. हिंगोलीचे तुळशीराम गुहाडे, नमीता देशमुख नांदेड, हिंगोलीचे विश्‍वनाथ ढोले लातुर येथे बदली झाली आहे. परभणीचे अमर केंद्रे लातूर, लातुरचे बालाजी गोणारकर नांदेड तर हिंगोलीचे प्रकाश आवडे यांची नांदेड येथे बदली झाली आहे.

या सोबतच नांदेडचे प्रविण आगलावे, रहिम चौधरी, असद शेख, गजानन काळे, नाजीर हुसेन, विजय पंतोजी, सुभाष वानोळे, गणेश गोटके, संगिता कदम, हिंगोलीचे बाबुराव जाधव, किशोर पोटे, लातुरचे देविदास नाटकरे, लक्ष्मण कोमवाड, उत्तम गुंठे, परभणीचे रहेमानखान पठाण यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे.या बदली आदेशानंतर हिंगोलीचे पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी तीन उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या असून यामध्ये नर्सीचे किशोर पोटे यांची औंढा नागनाथ, गोरेगावचे बाबुराव जाधव यांची हिंगोली शहर तर हिंगोली शहरचे अशोक कांबळे यांची हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात बदली केली आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news