हिंगोली : महालक्ष्मीचे हात बनवणाऱ्या महिला कारागिरांना मिळाला गावातच रोजगार

हिंगोली : महालक्ष्मीचे हात बनवणाऱ्या महिला कारागिरांना मिळाला गावातच रोजगार

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : येथील आखाडा बाळापूरच्या शेवाळा रोडवर दिलीप चेपुरवार व त्यांची पत्नी कमल यांनी 15 महिला कारागिरांना घरबसल्या रोजगार मिळवून दिला आहे. दरवर्षी महालक्ष्मीचे हात बनवण्याचे काम कारागिरांकडून करून घेतले जाते व ते ठोक भावा मध्ये औरंगाबाद, नांदेड, बीड, हिंगोली आदी जिल्ह्यामध्ये व्यापारी विक्रीसाठी घेऊन जातात.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिलीप नारायण चेपुरवार यांनी किमान 20 ते 25 वर्षे जनरल स्टोअरचा व्यवसाय केला. त्यानंतर त्यांनी हळूहळू व्यवसायामध्ये बदल करत महालक्ष्मीचे हात बनवण्याचे काम सुरू केले. कच्चा माल आणण्यासाठी थेट सुरत, हैदराबाद, अंबाजोगाई येथून हातामध्ये भरण्याची रुई आणि कापड खरेदी करण्यास सुरुवात केली. गेली पाच ते दहा वर्षांपासून त्यांनी या व्यवसायामध्ये वाढ केली आहे. दिलीप चेपूरवार यांना त्यांची पत्नी सौ कमल, दोन मुले राम व श्याम आणि सुनबाई ह्या कामांमध्ये मदत करतात. तसेच आखाडा बाळापूर शहरातून हात शिवणाऱ्या व त्यामध्ये रुई भरणाऱ्या महिलांना दररोज दालनामध्ये घरबसल्या काम मिळते. एका महिलेला दीडशे ते अडीचशे रुपये रोजगार मिळतो. हा तयार माल ठोक व्यापारी ऑर्डर देऊन ठेवतात. आणि महालक्ष्मीची स्थापना होण्यापूर्वी पंधरा दिवस अगोदर हा माल घेऊन जातात.

विशेष म्हणजे दिलीप चेपूरवार यांना शासनाचे अथवा बँकेचे किंवा जिल्हा उद्योग केंद्राकडून अद्याप एक रूपयाही कर्जरूपाने मिळाला नाही. या कारागिराची अशी इच्छा आहे की, जिल्हा उद्योग केंद्राने व बँकेने अर्थसहाय्य कर्ज म्हणून दिल्यास, किमान शंभर ते सव्वाशे महिलांना दररोज रोजगार मिळेल एवढा कच्चा माल उपलब्ध करता येईल, अशी इच्छा दैनिक पुढारी जवळ व्यक्त केली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिलीप चेपूरवार यांनी हा व्यवसाय सुरू करून सदर उद्योगांमध्ये आज 15 महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. आखाडा बाळाच्या शेवाळा रोडवर जय नरसिंह कारखाना या नावाने त्यांनी हा उद्योग सुरू केला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news