हिंगोली: वसमत येथील बेपत्ता शिक्षकाचा उखळी घाटामध्ये आढळला मृतदेह

हिंगोली: वसमत येथील बेपत्ता शिक्षकाचा उखळी घाटामध्ये आढळला मृतदेह

Published on

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : वसमत येथून बेपत्ता शिक्षकाचा मृतदेह माहूरजवळ उखळी घाटामध्ये आज (दि.१५) सकाळी आढळून आला. याप्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात आकस्‍मिक मृत्यूची नोंद झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक रिठे यांनी दिली.

वसमत येथील मयूरनगर भागातील रहिवासी बबन किशनराव डाढाळे (वय 56) हे शुक्रवारी सकाळी आठ वाजता जिल्हा परिषद शाळेत जातो, असे सांगून दुचाकीवरुन गेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी आलेच नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला होता. शाळेमध्ये चौकशी केली असता त्यांना शाळेतही माहिती मिळाली नाही. त्यामुळे रसिका डाढाळे यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी याबाबतची माहिती हिंगोली जिल्ह्यासह नांदेड व परभणी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना कळवली होती. दरम्यान, आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास माहूर जवळील उखळी घाटामध्ये मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रिठे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेह वसमत येथील बबन डाढाळे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी याबाबतची माहिती डाढाळे यांच्या कुटुंबीयांना दिली. मृत बबन डाढाळे हे वसमत तालुक्यातील सोमठाणा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news