उस्मानाबाद : बँक मॅनेंजरचे घर फोडून १५ तोळे सोने आणि ९० हजार लंपास

तुळजापूर तालुक्यातील उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या शाखेत मॅनेजरच्या घरावर मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी डल्ला मारला.
तुळजापूर तालुक्यातील उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या शाखेत मॅनेजरच्या घरावर मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी डल्ला मारला.
Published on
Updated on

उस्मानाबाद : पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर तालुक्यातील उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या शाखेत मॅनेंजरच्या घरावर मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी डल्ला मारला. पंधरा तोळे सोने, ९० हजार रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल लांबविला आहे. देविदास घोडके असे या बँक मॅनेंजरचे नाव आहे. येथील मधूशाली नगर,शिक्षक कॉलनी,जवाहर कॉलेज मागील नगर परिसरात चोरांचा नेहमीच वावर असतो. चोरीचा शोध करण्याचे पोलिसांसमोर आवाहन असणार आहे.

अणदूर येथील राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारील घोडके प्लॉट येथील देविदास घोडके यांच्या घरावरती रात्री एक ते दोनच्या दरम्यान चोरांनी चोरी केली. चोरीबद्दल पहाटे उठल्यानंतर लक्षात आले. मागील बाजूस किचनच्या दरवाजातून आत आलेल्या चोर आत आले. हॉलमध्ये झोपलेल्या आई व मुलांना आणि बेडरुममध्ये झोपलेल्या देविदास घोडके यांच्या रूमला कडी लावली. बाजूच्या रूम मधील कपाट फोडून जवळपास नऊ लाखाची चोरी करून फरार झाले. रात्री ३ वाजण्याच्या सुमारास देविदास घोडके हे उठले असता दरवाजा बाहेरून बंद असल्याचे दिसले.

हॉलमध्ये झोपलेल्या मुलाला फोन केले असता त्यांच्या रूमचाही दरवाजा बाहेरून बंद असल्याने त्यांनी इतरांची मदत घेतली. सकाळी चोरी झालेल्या भागास उस्मानाबाद पोलीस दलाच्या शॉन पथकाने व नळदुर्ग पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणी केली. मात्र चोरांचा तपास लागलेला नाही. सायंकाळ पर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम नळदुर्ग पोलीस ठाण्यात चालू असल्याची माहिती पोलीस बिट अंमलदार संतोष सोनवणे यांनी दिली.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news