परभणी : पोलीस निरीक्षकावर कारवाई करा; मनसेची मागणी

परभणी : पोलीस निरीक्षकावर कारवाई करा; मनसेची मागणी

मानवत पुढारी वृत्तसेवा : श्रीराम नवमी निमित्त काढण्यात आलेल्या उत्सव मिरवणुकीत वाद्यांना परवानगी नाकारल्याने रमेश स्वामी यांना निलंबित करण्याची मागणी मनसेच्या वतीने मोर्चा काढून करण्यात आली. श्रीराम भक्तांना अरेरावी करून शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक रमेश स्वामी यांना निलंबित करावे, यासाठी मनसेच्या वतीने सोमवारी (दि.३) पुकारण्यात आलेल्या मानवत शहर बंद व मोर्चा काढण्यात आला होता.

याबाबत माहिती अशी की, श्रीराम नवमीच्या निमित्ताने शहरात सार्वजनिक समितीच्या वतीने ३० मार्चला मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत पोलिसांनी वाद्यांना परवानगी दिली नसल्याने मनसेचे विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख शुभम दहे व शिवप्रसाद बिडवे यांनी मिरवणुकीदरम्यान भर रस्त्यावर विषारी औषध प्राशन केल्याने खळबळ उडाली होती . त्या दोघावर परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारही करण्यात आले होते . दरम्यान सदरील युवकांच्या नातेवाईकांनी या घटनेस पोलिस निरीक्षक रमेश स्वामी हे जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही केली होती. या अनुषंगाने सोमवारी ता ३ मनसेच्या वतीने पोलीस निरीक्षक रमेश स्वामी यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी सकाळी १० ते १२ पर्यंत बंद करण्यात आला. तसेच नगरपालिकेपासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

मोर्चात मनसेचे जिल्हाध्यक्ष गणेश सुरवसे, उपजिल्हाध्यक्ष महादेव काकडे, तालुकाध्यक्ष माऊली दहे, शहराध्यक्ष संतोष कुऱ्हाडे, दत्तराव शिंदे, भास्कर तारे, गणेश लाडाने, बालाजी पौळ , गोविंद होंडे, मुन्ना बिराजदार, नंदकिशोर रोडे, चंद्रकांत जवादे, तुळशीराम गागर्डे आदीजन सामील झाले होते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news