Parbhani Crime : परभणीत तरुणाचा घरातच निर्घृण खून

खंडोबा बाजार परिसरात मध्यरात्री रक्तरंजित थरार ; आरोपी अज्ञात
Parbhani murder case
परभणीत तरुणाचा घरातच निर्घृण खूनpudhari photo
Published on
Updated on

परभणी : शहरातील खंडोबा बाजार कॉर्नर परिसरात शनिवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरले. फिरोज खान अब्दुला खान (30) या तरुणाचा त्याच्या राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. प्राथमिक तपासात त्याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

रविवारी (दि.31) सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर नानलपेठ पोलिस ठाण्याला तातडीने माहिती देण्यात आली. काही वेळातच अप्पर शनिवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरले. फिरोज खान अब्दुला खान (30) या तरुणाचा त्याच्या राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. प्राथमिक तपासात त्याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Parbhani murder case
Sindhudurg Crime : अज्ञाताच्या गोळीबारात एक ठार

रविवारी (दि.31) सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर नानलपेठ पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, शहर उपविभागीय अधिकारी समाधान पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, नानलपेठ ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मारोती करावार, पोलिस उपनिरीक्षक व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्कॉडलाही पाचारण करण्यात आले होते व घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण सुरू करण्यात आले होते. मृताच्या मानेवर आणि पोटावर धारदार शस्त्राने गंभीर वार झाल्याचे प्राथमिक निरीक्षणात समोर आले आहे.

Parbhani murder case
Stray Dog Attack Karjat: कर्जतमध्ये भटक्या श्वानांचा बकऱ्यांवर हल्ला; 28 बकऱ्या मृत्युमुखी

आरोपी ओळखीतील असण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी नेमका गुन्हेगार कोण, याबाबत अजून कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, परिसरात अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांबाबत स्थानिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. या घटनेमागे अशा काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा संबंध असू शकतो का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news