Parbhani News : मानवत नगरपालिकेत कोण मारणार बाजी ?

रविवारी लागणाऱ्या निकालाच्या प्रतीक्षेत उमेदवारांची उडाली झोप; नागरिकांचे लक्ष
Parbhani News
Parbhani News : मानवत नगरपालिकेत कोण मारणार बाजी ?File Photo
Published on
Updated on

Who will emerge victorious in the Manwat Municipal Council elections?

मानवत, पुढारी वृत्तसेवा : नगर पालिका निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल रविवारी (दि. २१) जाहीर होणार असल्याने नगराध्यक्षपदासह ११ प्रभागांतील २२ जागांसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या दोन उमेदवारांसह एकूण ५८ उमेदवारांचे भवितव्य आता मतमोजणीवर अवलंबून असून शहरात पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Parbhani News
Parbhani News : कालव्यात पडून अल्पवयीन मजुराचा मृत्यू

मानवत नगर पालिकेची निवडणूकीसाठी दि.२ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. मात्र न्यायालयीन निर्णयामुळे दि.३ डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी पुढे ढकलण्यात आली. यामुळे तब्बल १७ दिवस उमेदवारांसह कार्यकर्ते व मतदारांना नगर परिषद मानवत प्रशासकीय कार्यालय निकालाची प्रतीक्षा करावी लागली.

सुरुवातीच्या काही दिवसांत शहरात आकडेमोडीच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र निकालास विलंब लागल्याने या चर्चाचा जोर काहीसा ओसरला होता. दरम्यान अनेक उमेदवार व कार्यकर्ते देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असून विजयासाठी साकडे घालत असल्याचे चित्र दिसून आले. मतदान पार पडल्यानंतर ही यंत्रे तहसील कार्यालयातील एका खोलीत कडेकोट पोलीस बंदोबस्तात आहेत. तहसील परिसरात चोख बंदोबस्त तैनात असून दोन अधिकारी, राज्य राखीव दल ९ जवान आणि दोन पाळ्यांत १८ पोलीस कर्मचारी रात्रंदिवस बंदोबस्तात आहेत. ११ प्रभागांतील २२ जागांसाठी बहुतांश ठिकाणी दुरंगी व तिरंगी लढती झाल्या. काही ठिकाणी अपक्ष निर्णायक भूमिका बजावू शकतात. त्यामुळे अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले.

Parbhani News
Parbhani News : मनपा आयुक्तांनी आचारसंहितेत निविदा काढली

नगराध्यक्षपदासाठी थेट झाली दुरंगी लढत

मानवत नगर पालिकेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राणी अंकुश लाड, तर भाजप-शिवसेना युतीकडून शिवसेनेच्या तिकिटावर अंजली महेश कोक्कर यांच्यात थेट लढत झालेली आहे. दोन्ही उमेदवारांनी शहरात जोरदार प्रचार केल्याने ही लढत अत्यंत चुरशीची ठरल्याचे पहावयास मिळालेले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ. राजेश विटेकर, युवानेते डॉ. अंकुश लाड यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. तर भाजप-शिवसेना युतीकडून पालकमंत्री मेघना बोर्डीकर, शिवसेनेचे सईद खान, माजी आ. सुरेश वरपूडकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यामुळे पालिकेचा निकाल जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवरही प्रभाव टाकणारा ठरणार आहे.

अशी होणार मतमोजणी

रविवारी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात मतमोजणीस सुरुवात होणार आहे. निवडणूक विभागाने सर्व तयारी पूर्ण केली असून मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रभाग १ ते ६ मधील १२ सदस्यांची, तर दुसऱ्या टप्प्यात प्रभाग ७ ते ११ मधील १० सदस्यांची व नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची मतमोजणी केली जाणार आहे. एकूण ६ टेबलांवर मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news