परभणी : शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी वेदांत सराफ याची निवड

परभणी : शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी वेदांत सराफ याची निवड
Published on
Updated on

सेलू , पुढारी वृत्तसेवा :  क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय पुणे व छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या तलवारबाजी स्पर्धेसाठी संत जनार्दन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चारठाणा येथील वेदांत सराफ याची निवड करण्यात आली आहे.

या शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा ५ ते ८ नोव्हेबर दरम्यान विभागीय क्रीडा संकुल छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. वेदांतच्या निवडीबाबत संस्थेचे अध्यक्ष मुकुंद चव्हाण, नामदेव चव्हाण, रामभाऊ चव्हाण, महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटना कोषाध्यक्ष प्रा. पांडुरंग रणमाळ, राज्य टेनिस व्हॉलिबॉल सचिव गणेश माळवे, परभणी जिल्हा योगासन संघटनेचे डी. डी. सोन्नेकर, प्रशांत नाईक, संजय भुमकर, मुख्याध्यापक एस .आर.महाजन, क्रिडा विभाग प्रमुख आर .एस .राठोड, संतोष शिंदे, राजेश राठोड आदींनी त्याचे स्वागत केले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news