

पुर्णा : एका धावत्या रेल्वेची जोरदार धडक बसल्याने डोक्यात गंभीर दुखापत होऊन एका २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना परभणी-पुर्णा लोहमार्गावरील फुकटगांव शिवारात गुरुवारी (ता.४) सप्टेंबर रोजी घडल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी पूर्णा पोलीस स्थानकांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत रामप्रसाद रेशसमाजी मोरे (वय २७) रा.कान्हेगांव ता.पुर्णा जि.परभणी असं त्या मयत तरुणाचे नाव आहे. तो आपल्या कुटुंबीयांसोबत कान्हेगांव येथे राहत शेतीचा व्यवसाय करुन उपजीविका भागवतो. गुरुवारी ता.४ रोजी सकाळच्या सुमारास तो शेताच्या कामासाठी फुकटगांव शिवारात आला होता.
दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र चिखल झाला असल्याने तो रेल्वे रुळाजवळून जात असताना धावत्या रेल्वेखाली सापडून त्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्या डोक्यात व पायाला गंभीर मार लागल्याच्या खुणा दिसुन आल्या. घटनेची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी कुटूंबीयांना व पोलीसांना दिली. घटनस्थळी पुर्णा पोलीस निरीक्षक विलास गोबाडे शिकाऊ फौजदार तरे, सपोउपनि रमेश मुजमुले, एकनाथ आळसे, आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी येथिल ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.
याप्रकरणी मयताचे चुलतभाऊ गोविंद बापुराव मोरे यांनी पुर्णा पोलीसांना दिलेल्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सपोउपनि रमेश मुजमुले हे करत आहेत.