

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील सारडा कॉलनी येथील सतीश नरवाडे यांच्या कॉम्प्लेक्स वर आणि गाडीवर दगडफेक करण्यात आली. यावेळी नरवाडे घटनास्थळावर गेले असता त्यांच्या गाडीवर दगडफेक करत मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. २०) रात्री घडली. (Parbhani Crime News )
याबाबत अधिक माहिती अशी की, सारडा कॉलनी रायगड चौक येथे सतीश माणिकराव नरवाडे यांचे कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्स वर काहीजण दगडफेक करीत आहेत. भाडेकरू यांनी कॉम्प्लेक्स चे कामकाज बघणारे फिर्यादी योगेश गोकुळराव नाद्रे व कॉम्प्लेक्स मालक सतीश नरवडे हे परभणीहून येत असताना फोनवरून त्यांना माहिती दिली. ते रात्री ९.३० च्या दरम्यान घटनास्थळी गेल्यावर धिंगाणा घालणारे निलेश उर्फ सोनू मोरे फराज शेख या दोघांनी फिर्यादी ठाकूर यांना मारहाण केली. तसेच सौरभ शिंदे हुसेन शेख या दोघांनी जिवे मारण्याची धमकी देत गाडीवर (एम एच 31 एफ ई 1376) दगडफेक करून नुकसान केले. तसेच शटरवरही दगडफेक केली. यानंतर चौघेजण पळून गेले. याबाबत गंगाखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास परिविक्षाधीन अधिकारी ऋषिकेश शिंदे करीत आहेत.
याबाबत वर्षभरापूर्वी सारडा कॉलनीतील नागरिकांनी पोलिसांना निवेदन दिले होते. परिसरात शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने पाऊल उचलावे, अशी मागणी सारडा कॉलनी व परिसरातील नागरिकांनी केली होती.